जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे भारतीय संविधानातील कलम ३७०, ०५ ऑगस्ट २०१९ रोजी रद्द करण्यात आले. आणि जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाला. अनेक सामाजिक आणि राजकीय घटनांची पार्श्वभूमी काश्मीरच्या इतिहासातील या महत्वाच्या घटनेला आहे. या निर्णयामागे कोणत्या शक्ती होत्या? जम्मू-काश्मीरच्या लोकांवर याचा काय परिणाम झाला? त्यांची यावर काय प्रतिक्रिया होती? आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे भविष्यात याचे परिणाम काय होतील? ज्येष्ठ अनुभवी पत्रकार जितेंद्र दीक्षित यांनी आपल्या `व्हॅली ऑफ द रेड स्नो` या पुस्तकात या प्रश्नांचा पूर्वग्रहविरहित उहापोह केलेला आहे. या स्वतंत्र भारताच्या इतिहासातल्या सर्वात मोठ्या निर्णयानंतर काश्मीर मध्ये होणाऱ्या बदलांची कथा सर्वसमावेशक पद्धतीने सांगितली आहे. कलम ३७० रद्द होण्याआधीचे काश्मीर, रद्दबातल झाल्यानंतचे लगेचच काश्मीर आणि आत्ताचे काश्मीर हे विविध मुलाखतींच्या द्वारे समोर आणले आहे. काश्मीर खोऱ्यामधला आंखो देखा हाल लेखकाने लिहिला आहे. जम्मू-काश्मीर विषयी आस्था असणाऱ्या प्रत्येकाने वाचावे असे पुस्तक. लाल बर्फाचे खोरे.
JITENDRA DIXIT IS THE WEST INDIA EDITOR OF ABP NEWS. BASED IN MUMBAI, HE HAS BEEN REPORTING ON CRIME, CONFLICT AND POLITICS FOR OVER TWENTY YEARS. HE HAS WORKED WITH AAJ TAK AND STAR NEWS EARLIER. AS A CRIME JOURNALIST, HE HAS REPORTED EXTENSIVELY ON THE MUMBAI UNDERWORLD. HE COVERED THE 26/11 MUMBAI TERROR ATTACKS FROM GROUND ZERO FOR STAR NEWS AND WROTE A BOOK ABOUT IT, WHICH WAS A BESTSELLER IN HINDI AND MARATHI. HE WAS ONE OF INDIAS REPRESENTATIVES AT A CONFERENCE ORGANIZED BY THE FBI TO COMBAT ORGANIZED-CRIME SYNDICATES AT NEW YORK CITY IN 2011. IN 2015, JITENDRA WON THE RED INK AWARD IN THE POLITICAL CATEGORY FOR HIS DOCUMENTARY ON THE KASHMIR ASSEMBLY ELECTIONS.
जीतेंद्र दीक्षित हे एबीपी न्यूजचे पश्चिम भारताचे संपादक म्हणून कार्यरत आहेत. मुंबईस्थित पत्रकार असून गेल्या वीस वर्षांपासून गुन्हेगारी विश्व, गुंतागुंतीची सामाजिक परिस्थिती आणि राजकारण हे महत्त्वाचे विषय ते कव्हर करीत आहेत. या पूर्वी ते आजतक आणि स्टार न्यूज चॅनलमध्ये कार्यरत होते. जीतेंद्र यांनी मुंबई विद्यापीठात राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. राजकारण या विषयात बातमीदारी करताना त्यांनी भारतातील २० विधानसभा निवडणुका आणि पाच लोकसभा निवडणुका कव्हर केलेल्या आहेत.
PARAG POTDAR HAS DONE HIS MASTER IN MASS COMMUNICATION AND JOURNALISM. HE IS GOLD MEDALIST WITH 18 YEARS EXPERIENCE IN JOURNALISM. HE HAS WRITTEN 3 ORIGINAL BOOKS AND TRANSLATED 7 BOOKS SO FAR.
पराग पोतदार हे वृत्तपत्रविद्या पदवीतील सुवर्ण पदक विजेते आहेत. त्यांना पत्रकारितेतील १८ वर्षांचा अनुभव असून त्यांची तीन स्वतंत्र पुस्तके आणि सात अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत.
A pioneer in the publication industry for nearly four decades, Mehta Publishing House Pvt. Ltd. has stood the test of time gloriously by just doing what the vision statement states, celebrating Marathi as regional language and publishing rustic stories by renowned authors not only from Marathi literature but also across the globe. Being true to its roots, the company believes in exploring the rich literature of India and lauds homebred writers with great responsibility and pride. This very core belief has what led Mehta Publishing House Pvt. Ltd. to become the leaders in Marathi publishing in India today.