ज्येष्ठ पत्रकार मीना मेनन. `हिंदू` वर्तमानपत्राच्या प्रतिनिधि म्हणून त्या ऑगस्ट २०१३ मध्ये इस्लामाबाद, पाकिस्तान इथे गेल्या. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी २०१४ मध्ये त्यांचा व्हिसा रिन्यू न करता त्यांना भारतात परत निघून जायला सांगितलं. इस्लामाबादमध्ये सततचे पहारे आणि तणावाचं वातावरण असूनही त्यांनी आपला पत्रकारिता धर्म सोडला नाही. हिंडण्याफिरण्यावर इतके निर्बंध असूनही त्यांनी केवळ बातम्या द्यायचं काम केलं नाही. तर `हिंदू` साठी अनेक लेख लिहिले.फाळणीतून बचावलेल्या नागरिकांशी संवाद साधला, अहमदी लोकांना भेटल्या, त्या बॉम्बस्फोटातील बळींशी बोलल्या, अफगाण रेफ्युजी कॅम्पमध्ये जाऊन आल्या आणि त्यांनी मुर्रे ब्रेवरी विषयी सुद्धा लिहिलं. मुशर्रफ यांच्या कोर्ट केसला उपस्थित राहून त्याचंही वार्तांकन केलं. पाकिस्तानातून वार्तांकन करणं ही भारतीय पत्रकारांसाठी सगळ्यात अवघड आणि तरीही रोमांचक कामगिरी समजली जाते. मीना मेनन यांनी तटस्थपणे आणि मानवीय पातळीवर पाकिस्तानचे हे वार्तांकन केले आहे. प्रत्येक भारतीयाने पाकिस्तानविषयी जाणून घेण्यासाठी वाचावे असे पुस्तक.
MEENA MENON IS AN INDEPENDENT JOURNALIST AND AUTHOR. SHE WAS FORMER BUREAU CHIEF OF THE HINDU IN MUMBAI SHE IS CURRENTLY PURSUING A PHD IN THE SCHOOL OF HISTORY AT THE UNIVERSITY OF LEEDS,UK. SHE HAS BEEN A JOURNALIST SINCE 1984, WORKING IN BOMBAY MAGAZINE, THE UNITED NEWS OF INDIA, MID-DAY , THE TIMES OF INDIA AND THE HINDU. SHE IS THE AUTHOR OF THE BOOKS RIOTS AND AFTER IN MUMBAI: CHRONICLES OF TRUTH AND RECONCILIATION, REPORTING PAKISTAN , A FRAYED HISTORY: THE JOURNEY OF COTTON IN INDIA(CO AUTHOR), ORGANIC COTTON: REINVENTING THE WHEEL, AND THE UNSEEN WORKER: ON THE TRAIL OF THE GIRL CHILD.
मीना मेनन या स्वतंत्र पत्रकार आणि द हिंदू च्या माजी उपसंपादक आहेत. १९८४ मध्ये त्यांची पत्रकार म्हणून कारकीर्द सुरु झाली. त्यानंतर त्यांनी बॉम्बे मॅगझीन, युनाइटेड न्यूज ऑफ इंडिया, मिडडे , टाइम्स ऑफ इंडिया आणि द हिंदू मध्ये काम केले. हिंदू कडून त्या वार्तांकनासाठी इस्लामाबादला गेल्या तेव्हा त्या हिंदू , मुंबई विभागाच्या प्रमुख होत्या. आगस्ट २०१३ ते मी २०१४ हा ९ महिन्यांचा काळ पाकिस्तानातून वार्तांकन केल्यानंतर त्या दिल्ली मध्ये पर्यावरण वार्तांकन करत होत्या. रायट्स आणि आफ्टर इन मुंबई, ऑरगॅनिक कॉटन , री इन्व्हेंटिंग द व्हील आणि रिपोर्टींग पाकिस्तान या पुस्तकांच्या त्या लेखिका आहेत.
MUKTA DESHPANDE HAS DONE MASTER OF ARTS IN ENGLISH LITERATURE. SHE HAS EIGHT TRANSLATIONS ON HER NAME INCLUDING LITERARY AND ACADEMIC TRANSLATIONS.
मुक्ता देशपांडे ह्या इंग्रजी साहित्य विषयातील कला शाखेच्या पदवीधर आहेत. त्यांना अनुवादात विशेष रुची असून आतापर्यंत त्यांनी आठ पुस्तकांचा अनुवाद केला आहे. यात साहित्यिक अनुवादांसोबतच शैक्षणिक पुस्तकांच्या अनुवादाचाही समावेश आहे.
A pioneer in the publication industry for nearly four decades, Mehta Publishing House Pvt. Ltd. has stood the test of time gloriously by just doing what the vision statement states, celebrating Marathi as regional language and publishing rustic stories by renowned authors not only from Marathi literature but also across the globe. Being true to its roots, the company believes in exploring the rich literature of India and lauds homebred writers with great responsibility and pride. This very core belief has what led Mehta Publishing House Pvt. Ltd. to become the leaders in Marathi publishing in India today.