1947मध्ये रिओ डि जेनेरो येथे जन्मलेल्या आमच्या काळातील सर्वांत प्रभावशाली लेखकांपैकी एक पाउलो कोएलो यांनी अनेक आंतरराष्ट्रीय बेस्टसेलर पुस्तकांचे लेखन केले आहे. द अॅल्केमिस्ट, मॅन्युअल ऑफ द वॉरियर ऑफ लाइट, द पिल्ग्रिमेज, द वॅल्करिज, ब्रीडा, द फिफ्थ माउण्टेन, इलेव्हन मिनट्स, द झाहिर, द विच ऑफ पोर्टोबेलो, वेरोनिका डिसाइड्स टु डाइ, द विनर स्टेण्ड्स अलोन, अलेफ, एडल्ट्री आणि हिप्पी या पुस्तकांबरोबरच त्यांच्या इतर पुस्तकांची 320 दशलक्षांहून अधिक प्रतींची विक्री झाली आहे.